तांबे वस्ती शाळेच्या बालदिंडीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबे वस्ती येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. तर मुलींनी कलश सजवून आणले होते. यावेळी शिवाजी तांबे व निवृत्ती तांबे यांनी बालदिंडीला चहा व नाश्ता दिला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे, […]

सविस्तर वाचा

अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी कदम सर यांची निवड 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी ज्ञानदेव कदम सर यांची पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीबद्दल बालाजी देडेगाव येथे पत्रकार बन्सीभाऊ एडके व पत्रकार इन्नुस पठाण यांच्या वतीने कदम सर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य स्वरुपचंद […]

सविस्तर वाचा

मा. प्राचार्य मुरलीधर दहातोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ५०१ झाडांचे वृक्षारोपण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील व्यंकटेश पाणी वाटप संस्थेचे विद्यमान चेअरमन व मा. प्राचार्य मुरलीधर दहातोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ५०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, म.ल. हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान परिसरात ५०१ झाडे लावून दहातोंडे सर यांचा अभिष्ठचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. पावन महागणपती देवस्थानच्या परिसरामध्ये पावन महागणपती […]

सविस्तर वाचा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली

जनशक्ती, वृत्तसेवा-  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रधानमंत्री मन की बात अंतर्गत आईच्या नावाने एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहशिक्षिका श्रीमती मनिषा कांबळे यांनी आई बेबीलता रोहिदास कांबळे तर मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी आई सरस्वती अर्जुन घटमाळ यांच्या नावाने वृक्षारोपण केले. शिक्षकांनीच आपल्या कृतीतून विद्यार्थी मित्रांना […]

सविस्तर वाचा

पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्यासह पाच जणांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून […]

सविस्तर वाचा

नागेबाबा मल्टीस्टेटने जपली सामाजिक बांधिलकी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विश्वविक्रम प्रस्थापित नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, सक्षम झाला पाहिजे, यासाठी सतत प्रयत्नशील असते. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखा देडगाव (ता.नेवासा) […]

सविस्तर वाचा

तिसगाव अर्बन संस्थेद्वारे तेलकुडगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे तिसगाव अर्बन संस्थेद्वारे परिसरातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हभप महंत सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम) तसेच सरपंच, उपसरपंच ,सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तिसगाव अर्बन 2 मे 2022 पासून बालिका समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य […]

सविस्तर वाचा

पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत. गेल्या 2 दिवसांपासून चर्चा होत असलेल्या ‘लाडकी बहिण योजनेची’ घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. यासह अर्थसंकल्पात पुढील महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 👉मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना- राज्यात लेक […]

सविस्तर वाचा

ओंकार मुंगसे यांच्या यशाबद्दल नागेबाबा परिवाराकडून सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- केंद्रीय विद्यालय नंबर-2 एम आय आर सी अहमदनगर येथे बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ओंकार अंबादास मुंगसे याने दहावीच्या परीक्षेत 82.40 टक्के गुण मिळवले आहेत. ओंकार याने वर्गात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ओंकार मुंगसे याचा नागेबाबा परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, ओंकारचे आजोबा […]

सविस्तर वाचा